Pages

Friday, February 22, 2013

आपले साहेब गेले

शिवसेनाप्रमुख बाबासाहेब ठाकरे यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकाकुल झाला. अनेकांना पोरके झाल्यासारखेही वाटले. माझे अनेक मित्र मला म्हणाले कि आता मराठी आणि महाराष्ट्राचे काय? मला समजेच ना कि त्यांना काय बोलू. मी म्हणालो, मराठी माणसाचे भविष्य त्यांच्याच हातात आहे. खरंतर चिंता आहे मला. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ हरपला. आता मराठीचा कैवारी कोण?

प्रत्येक वेळी मराठी माणसाला समोर कुणी का हवे असते? मी मराठीच्या उद्धारासाठी बोलणार्यांच्या विरोधात नाही. मला फक्त एवढेच बोलायचे आहे कि आपण स्वतः कधी लढायला शिकणार? माझ्यामते प्रत्येक मराठी माणूस एक शक्ती आहे. आणि जेव्हा हि शक्ती एकवटेल तेव्हा उद्याचा महाराष्ट्र त्यांच्या सहभागाने घडेल. होय, महाराष्ट्राला तुमची गरज आहे. ह्या मराठीला तुमची गरज आहे. प्रत्येक वेळी पक्ष मदतीसाठी येईल, असे म्हणून स्वस्त बसू नका. पक्ष हा तुमच्यामुळे घडतो आणि मोठा होतो. तुम्ही जर मराठी प्रेमी असाल, तुम्हाला जर तुमच्या मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठी काही करावयाचे असेल, तर सुरुवात करा. अजूनही वेळ गेली नाही. मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने एकत्र येण्याची गरज आहे. या, आणि आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवा.

मराठीचा विजय असो!
मराठी राष्ट्राचा विजय असो!