Pages

Monday, April 30, 2012

उद्याचा महाराष्ट्र

ह्या महाराष्ट्राच्या स्थापणेला आज ५२ वर्ष पूर्ण होत आहेत. अशा महत्वाच्या दिवशी महाष्ट्राच्या भविष्याबद्दल विचार करणे सहाजिकच आहे. महाराष्ट्राचा विचार करतांना मराठीचा विचार हि करवला लागेल, कारण शेवटी ह्या मराठी भाषेच्या आधारावरच महारष्ट्राची स्थापना झाली आहे. मराठी भाषा आणि मराठी संकृती हे महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनाचा एक अभेद्य भाग आहे. ज्या मराठी भाषेच्या आधारावर ह्या महाराष्ट्राची स्थापना झाली त्या मराठी भाषेची वर्तमान स्तिथी अतिशय हलाकीची आहे. मराठीच्या राज्यात मराठीला स्थान नाही. ज्या मुंबईसाठी १०६ हुतात्म्यांनी आपले प्राण गमावले, त्या मुंबई शहरामध्ये मराठी प्रभावशून्य झाली आहे. मराठी फक्त नामशेष उरली आहे. पारराज्यातून आलेली लोक स्थानिक मराठी जनांना विचारतात कि मुंबई मराठी माणसाची कधी पासून झाली? मराठीच्या मुंबईत मराठी माणूसच नाही. मग त्यावर मुंबईला बॉम्बे बोलण्याचा हट्ट. ती लोक हे समजत का नाही कि जर ते महारष्ट्रात येतात तर महाराष्ट्राचे बनून राहणे गर्जेचे आहे. उलट मराठी माणसालाच प्रश्न केला जातो कि त्याचा मुंबईवर हक्क कसा?

अमराठी लोकांचे वर्चस्व महारष्ट्रात वाढण्याचा एकमेव कारण मराठी माणूस स्वतः आहे. मराठी माणूस नेहमी बेसावाद राहिला. आजही आपण हे समजत नाही कि मराठीसाठी लढा देणे काळाची गरज आहे. प्रत्येक वेळी मराठीच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या पक्षांना आपण जातीवादी आणि धर्मांध पक्ष म्हणून पाहिले तर कसे चालेल. मग ह्या पक्षांना मत देणारी मराठी जनता काय जातीवादी आणि धर्मांध आहे? हि पक्ष सहजच ४०% मत मिळवतात. मग आपण असे म्हणू का कि ४०% मराठी जनता धर्मांध आणि जातीवादी आहे? नाही. स्वतःच्या हक्कांसाठी लढणे जातीवाद नाही. मराठी माणसाच्या मनात मराठी बद्दल जरा हि प्रेम शिल्लक नाही का? का आपण पदोपदी मराठीचा त्याग आणि परभाषेचा स्वीकार करत आहोत? का आपण मराठीत बोलत नाही? अनेकांना वाटते कि माझ्या एकट्याने मराठीत बोलून काय होणार आहे. पण प्रत्येक मराठी माणूस लाखमोलाचा आहे. तुम्ही एक नाही तर ७ कोटी आहात. जर सगळ्यांनी असाच विचार केला तर मराठीचा नाश होईल.

म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो कि तुम्ही मराठीचा मान वाचवा. मराठीच्या हक्कांसाठी लढा. आपण सारे मराठी आहोत आणि हि मराठी मायबोली आपली माउली आहे. तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी भाषा आणि संस्कृती हे आपल्या जीवनाचे अभेद्य स्थंभ आहेत. त्याचे संरक्षण करा!

मराठीचा विजय असो
मराठीराष्ट्राचा विजय असो

No comments:

Post a Comment