सध्याची परिस्थिती बघता असं वाटतं कि मराठी माणसाची महाष्ट्रातच पीछेहाट होत आहे. मला नवल वाटतं कि आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात गेलो तर आपल्याला ह्या गोष्टीची शाश्वती बिलकुल नाही कि समोरच्या व्यक्तीला मराठी बोलता येईल कि नाही. आपण मराठीत बोलायला सुरवात केली लहेच समोरून आवाज येतो "हिंदी में बोलो". किती हास्यास्पद आहे हे. ह्याच प्रमाणे जर आपण बंगाल किव्वा केरळला गेलो तर हे नक्की कि तेथील लोकांना तेथील भाषा बोलता येत असेल. मग महाराष्ट्रातच असे का घडते कि येथेच मराठी मागे पडली. महाराष्ट्राची स्थापना मराठी भाषिक राज्य म्हणून झाली होती ना. मग ह्याच महाराष्ट्रात जेव्हा मराठी पाट्या लावण्यास सांगितले जाते तर लोकांची ह्या विरोधात कोर्टात जाण्याची हिम्मतच कशी होते? महाराष्ट्रात मराठी अक्षर मोठे असावे यात गैर काय? तर विरोध झालाच. हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचे.
कदाचित मराठी बोलणारा प्रदेश स्वतंत्र मराठी राष्ट्र झाला तरच मराठी माणूस आणि त्याची संस्कृती टिकू शकेल. किती लोक संमत आहेत? अभिप्राय कळवा ईमेल द्वारे.
marathi.rashtra@gmail.com
मराठीचा विजय असो!
मराठी राष्ट्राचा विजय असो!
No comments:
Post a Comment