घासल्या शिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला
मराठी शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला
Tuesday, December 6, 2011
आजच्या महाराष्ट्रामधील मराठीची परिस्तिथी
मला हे लिहायला खूप दुःख होते कि ज्या मराठी भाषेच्या आधारावर ह्या महाराष्ट्राची स्थापना झाली त्या भाषेलाच आज महारष्ट्रात मान नाही. मराठी भाषेला पोषक असे काहीही केले तर लोकांना ते अमराठी जनतेवर अन्यायकारक आहे असे वाटते. काही काळापूर्वी मराठी पाट्यांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. तेव्हा देखील काही लोकांनी त्या चळवळीचा विरोध केला. खरंतर मराठीच्या राज्यातच मराठीचा विरोध होतो हे आश्चर्यजनक आहे. मुंबई मध्ये तर मराठी आहे कि नाही हाच प्रश्न विचारायला हवा. रस्त्यावर कोणासोबत मराठीत बोलले तर ती व्यक्ती आपल्याकडे अशा नजरेने पाहते जाणू आपण दुसऱ्या जगातून आलो आहोत. हल्ली लोकांनी हे गृहीतच धरले आहे कि मुंबई मध्ये मराठीला काहीही स्थान शिल्लक उरलेले नाही. खरंतर हा एक विरोधाभास आहे. लालबाग, पार्ला आणि दादर अजूनही मराठीच्या प्रचंड प्रभावाखाली आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment